Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाइलच्या व्यसनावर पालकांनी नियंत्रण ठेवावेगटशिक्षणाधिकारी शबाना शेख ; रवंदे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कोपरगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले मोबाइलचे व्यसन कमी करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने त्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. रवंदे येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला उपसरपंच ऋषिकेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष दवंगे होते. यावेळी बोलताना शेख यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष ही भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले. पालकांनी जागरूक राहून मुलांमध्ये वाचनाची सवय आणि विविध कलागुणांची आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी मुलांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, यासाठी जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करत या शाळा म्हणजे ज्ञानमंदिरे असल्याचे सांगितले.   यावेळी सरपंच शोभा  भवर, उपसरपंच ऋषिकेश कदम, मार्केट कमिटी सदस्य साहेबराव लामखडे, सुभाष दवंगे, तान्हाजी लामखडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले, संदीप कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, तसेच विविध अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी केले, तर शिक्षक अशोक कानडे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

‘ज्ञानगंगा’च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगावचे चौघे ‘टॉप टेन’ मध्ये 
संजीवनी सैनिकी स्कूलचा साई बोळीज दहावीत प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात

कोपरगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले मोबाइलचे व्यसन कमी करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने त्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. रवंदे येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला उपसरपंच ऋषिकेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष दवंगे होते. यावेळी बोलताना शेख यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष ही भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले. पालकांनी जागरूक राहून मुलांमध्ये वाचनाची सवय आणि विविध कलागुणांची आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी मुलांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, यासाठी जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करत या शाळा म्हणजे ज्ञानमंदिरे असल्याचे सांगितले.

  यावेळी सरपंच शोभा  भवर, उपसरपंच ऋषिकेश कदम, मार्केट कमिटी सदस्य साहेबराव लामखडे, सुभाष दवंगे, तान्हाजी लामखडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले, संदीप कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, तसेच विविध अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी केले, तर शिक्षक अशोक कानडे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS