अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा

नगर :  अहमदनगर महाविद्यलयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पंधरवाडा साजरा करण्यात आला.  ऑनलाईन विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. यात

करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना किराणा वाटप
मुलीला पळवले, पुन्हा घरी सोडले व पुन्हा पळवले…

नगर : 

अहमदनगर महाविद्यलयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पंधरवाडा साजरा करण्यात आला.  ऑनलाईन विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. यात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर विविध संस्कृतीचा परिचय विद्यार्थ्यांनी करून दिला. राष्ट्रीय एकतेसाठी गीत गायन, देशभक्तिसाठी शौर्य कथा वाचण्यात आल्या. व्याख्यान आयोजनात महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयातील प्रा.डॉ.रंजना रामचंद्र वर्दे यांनी भाषेचे व साहित्याबद्यदल मार्गदर्शन केले. 

त्यात त्यांनी मातृभाषेबरोबर अन्य भाषेचे ही ज्ञान प्राप्त करावे असे सांगितले. तर न्यू आर्टस कॉमर्स व सायंस कॉलेज अहमदनगर येथील प्रा.डॉ.सुनीता मोटे यांनी समाजात मानवतेसाठी साहित्याचे योगदान महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच या कार्यक्रमांतर्गत शौर्यकथा वाचन व देश भक्ती गायनाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या, यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई विद्यापठाचे प्रा.डॉ.सचिन गपाट म.प्रदेश येथील प्रो.आनंदप्रकाश त्रिपाठी यांनी उपस्थीत राहुन मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी  प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागाध्यक्ष प्रो.डॉ.ऋचा शर्मा यांनी केले. 

      यावेळी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की , हिंदी साहित्यामुळे जीवनातील विविध स्तरावरील अनुभव समृद्ध होत आहे. सर्वांचे हित साधणारे साहित्य हे कोणत्याही भारतीय भाषेत वाचले पाहिजे. आजच्या भौतिक जगातील धावपळीत माणुस संवेदना हरवून बसला आहे. हिंदी भाषा प्रत्‍येक भारतीयाच्‍या हृदयाशी जोडली जाण्याची गरज आहे.असे ते म्हणल्या.

    यासाठी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकरी प्रा.अशोक घोरपडे‚ डॉ.पूर्णिमा बेहरे‚ प्रा.चेतन  रवेलिया‚  प्रा.फरहान शेख यांचे सहकार्य लाभले. तसेच लोकसेवा महाविद्यालयऔरंगाबाद येथील डॉ.दस्तगीर देशमुख श्री संत सावता माळी महाविद्यालयातील डॉ.अश्विन रांजणीकर व डॉ.दत्तात्रय येडले यांचे सहकार्य लाभले. 

     तृप्ती गुप्ता‚ सुवर्णा हिवाळे‚ पुजा कुमारी‚ टीना यादव‚ सबीना शेख‚ शिवानी कुमारी‚ फिरदोस सययद‚ टीना यादव‚ आदेश घोगरे‚ सिमरन जोशी या विद्यार्थ्यांनी वरील सर्व कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS