Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी महादेव गंगणे यांची नियुक्ती

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महादेव सोपान गंगणे यांची परळी शहराध्यक्षपदी नि

किनवट नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना वेग; ’स्वीकृत’ पदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध वर्णी!
नांदेडात भाजपचा महाजल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी, मिठाईचे वाटप
मंत्री भुजबळ यांचे सभापती राम शिंदेंकडून स्वागत  

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महादेव सोपान गंगणे यांची परळी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.
बीड येथील ‘संघर्ष योद्धा’ जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व परळी तालुका अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या उपस्थितीत गंगणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवा नेते श्रीनिवास राऊत उपस्थित होते.
महादेव गंगणे हे 1999 पासून शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 2004 पासून त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेत पक्ष विस्तार, संघटन बळकटीकरण आणि प्रचारासाठी मोलाचे योगदान दिले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला असला तरी त्यांचा लोकसंपर्क मजबूत असल्याचे मानले जाते. जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या बळावर पक्षहितासाठी काम करणारे गंगणे हे सर्वसामान्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देतात. त्यांच्या अनुभवाचा पक्ष विस्तारासाठी मोठा फायदा होईल, असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला. ही नियुक्ती जिल्ह्यातील खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड तसेच जिल्हा कार्यकारिणीशी चर्चा करून प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS