Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना वेग; ’स्वीकृत’ पदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध वर्णी!

किनवट : स्थानिक राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. किनवट नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या ’स्वीकृत न

मंत्री भुजबळ यांचे सभापती राम शिंदेंकडून स्वागत  
नांदेडात भाजपचा महाजल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी, मिठाईचे वाटप
परळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी महादेव गंगणे यांची नियुक्ती

किनवट : स्थानिक राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. किनवट नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या ’स्वीकृत नगरसेवक’ पदावर प्रशांत सुरेशराव कोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या कोट्यातून ही निवड झाल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कोरडे यांच्या निवडीमुळे शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडी प्रक्रियेत अनेक बड्या नावांची चर्चा होती. विशेषतः सत्ताधारी गटाकडून अनिल तिरमनवार आणि दीपक नेम्मानीवार यांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीने प्रशांत कोरडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या बाजूने एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुजाता विनोद एंड्रलवार यांनी कोरडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना प्रशांत कोरडे भावूक झाले. त्यांनी स्पष्ट केले की, शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल. उपेक्षित घटकांच्या समस्या सोडवण्याला ते प्रथम प्राधान्य देतील.मूलभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ते कटिबद्ध राहतील. प्रशांत कोरडे हे जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीबद्दल नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार, बेबीताई नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), ज्योतिबा खराटे (शिवसेना जिल्हाप्रमुख), करण एंड्रलवार, फिरोज दोसानी (नगराध्यक्ष माहूर), माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राजकीय वर्तुळातील अनेक तर्क-वितर्क फोल ठरवत महाविकास आघाडीने एका सक्रिय कार्यकर्त्याला संधी दिली आहे. आता नवीन ’स्वीकृत’ नगरसेवक शहराच्या तिजोरीचा आणि विकासाचा समतोल कसा राखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS