Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

अंबाजोगाई : तालुक्यातील मौजे मोरेवाडी येथील हनुमान मंदिरात 19 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत रौप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्य

वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकारबाभूळवाडीत महा आरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेचा प्रेरणादायी आदर्श
अंबाजोगाई - विकिपीडिया

अंबाजोगाई : तालुक्यातील मौजे मोरेवाडी येथील हनुमान मंदिरात 19 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत रौप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त श्री तुकोबाराय चरित्र कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध भजन-कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी हा आध्यात्मिक मेळा ठरणार आहे.
सप्ताहाचा शुभारंभ रविवारी (दि.19 एप्रिल) सकाळी 7 वाजता कलशपूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन, टाळ-मृदंग व वीणा पूजनाने झाला. हा कार्यक्रम ह.भ.प. किसन महाराज पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी ह.भ.प. उद्धव बापु आपेगावकर, ह.भ.प. केशव महाराज वाघाळाकर, ह.भ.प. दामु भालेकर, ह.भ.प. शिवाहरी गडदे आदी मान्यवर उपस्थित होते. या सप्ताहात प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. महादेव महाराज बोराडे (शास्त्री) यांच्या श्री तुकोबाराय चरित्र कथेला विशेष आकर्षण आहे. त्यांच्या सोबत मृदंगवादनासाठी ह.भ.प. ऋषिकेश महाराज जाधव तर गायनासाठी ह.भ.प. हर्षद महाराज दसवडकर आणि ह.भ.प. मनोज महाराज शिंदे यांची साथ लाभणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी चरित्र कथा, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन व हरिजागर असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 20, 23, 24 आणि 25 एप्रिल रोजी रात्री विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात मृदंग संवाद, भजन संध्या, अभंगवाणी आणि सामूहिक भजनाचा समावेश आहे. दररोज विविध नामांकित कीर्तनकार आपली सेवा देणार असून 26 एप्रिल रोजी ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री प्रसिद्ध भारूड सम्राट ह.भ.प. सावता केशव फुले यांचा रंगीत सोंगी भारूडाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या रौप्य महोत्सवी सप्ताहात अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध भजनी मंडळे सहभागी होणार असून, सर्व भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, मोरेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS