Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडात भाजपचा महाजल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी, मिठाईचे वाटप

नांदेड : पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, आसाम या तीन राज्यात मिळविलेल्या महाविजयाबद्दल भाजपच्या वतीने शहरातील आयटीआय चौकात माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक

काँग्रेसमध्ये ‘खांदेपालट’ की जुन्याच चेहर्‍यांची पुनर्बांधणी? नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर नाराजी; ‘बी टीम’चा आरोप पुन्हा चर्चेत
14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन
भाजपाच्या रणनीतीचा नवा अध्याय? एमआयएमचे मसूद अहमद खान विरोधी पक्षनेतेपदी; मनपा राजकारणात खळबळ

नांदेड : पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, आसाम या तीन राज्यात मिळविलेल्या महाविजयाबद्दल भाजपच्या वतीने शहरातील आयटीआय चौकात माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून तसेच मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यासाठी नगरसेवक आशिष नेरलकर यांनी पुढाकार घेतला होता.
तीन राज्यात भाजपने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल आयटीआय चौकात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फटाक्यांची ’लक्षवेधी’ आतिषबाजी करण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या तालावर भाजपा पदाधिकार्‍यांनी ठेका धरला. जय श्रीराम चा गगनभेदी जयघोष करण्यात आला. यावेळी माजी आ. अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी – पाटील, दिलीप कंदकुर्ते, श्रावण भिलवंडे, उपमहापौर दीपकसिंह रावत, संतोष मानधने, नगरसेवक आशिष नेरलकर, केदार नांदेडकर, ड.दिलीप ठाकूर, विजय येवनकर, जयश्री पावडे, मंगाराणी अंबुलगेकर, मोहिनी येवनकर, सौ.मृणाल राजूरकर, रंजना सावंत, नगरसेविका ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख,  संतोष मुळे, किशन कल्याणकर, साहेबराव गायकवाड, अभिषेक सौदे, अपर्णा चितळे, सुरेश लोट, नगरसेवक सुमित मुथा यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS