अर्धापूर : प्रतिनिधी तालुक्यातील पार्डी (म.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्या
अर्धापूर : प्रतिनिधी तालुक्यातील पार्डी (म.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठराव मदने हे होते तर प्रमुख पाहुणे ग्रामविकास अधीकारी शिवकुमार देशमुख, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत देशमुख,प्रकाशराव भांगे,पो.पा.किरण भांगे,पत्रकार युनुस नदाफ,प्रशांत देशमुख,देविदास कांबळे,साहेबराव हापगुंडे,महेश देशमुख यांची उपस्थीती होती.यावेळी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.संविधानाची ग्रामविकास अधीकारी शिवकुमार देशमुख यांनी शपथ दिली.संचालक निळकंठराव मदने यांच्या हस्ते उपस्थीतांना संविधानाची प्रतिमेचे वितरण करण्यात आले.यावेळी आदींनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या करण तुकाराम गायकवाड या विद्यार्थ्याचा ग्रामपंचायतच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अशोकराव मदने, बालाजी पाटोळे,दिपक कांबळे,अंगणवाडी सेविका लता दाढेल,रेखा कांबळे,नमिता जोगदंड,मंदा नरोटे,रोमा डोईफोडे,स्वाती कांबळे, आशा पर्यवेक्षक अनिता ठाकूर, ग्रामपंचायत कर्मचारी राम इबितवार, आदींची उपस्थीती होती.

COMMENTS