Homeताज्या बातम्याअहमदनगर

‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’चे 86 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

 निघोज : राज्यस्तरीय सामान्य ज्ञान ‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध के

माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गायकवाड रुजू
शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

 निघोज : राज्यस्तरीय सामान्य ज्ञान ‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विविध इयत्तांमधील तब्बल ८६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत स्वतःसह पालक व शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.या परीक्षेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राज्य व केंद्रस्तरावर उत्कृष्ट गुण मिळवले. इयत्ता पहिलीत वेदिका गाढवे (१४० गुण) हिने राज्यात सहावा क्रमांक मिळवला, तर शिवम शिंदे (१३८) याने सातवा क्रमांक पटकावला. तसेच स्वर्णीश शेळके, जिजा सातव व प्रजीत दुर्गे यांनी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवत विशेष कामगिरी केली.इयत्ता दुसरीत साई करंजुले (१३८) याने राज्यात सातवा व जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. इतर विद्यार्थ्यांनीही केंद्रस्तरावर विविध क्रमांक पटकावले. इयत्ता तिसरीत शौर्य थेऊरकर (२५०) याने केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला, तर चौथीत धनश्री कौठाळे (२७८) हिने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून ठसा उमटवला.इयत्ता पाचवीत आर्यन कोकाटे (२७६) केंद्रात प्रथम, सहावीत आरोही झगडे (२४४) प्रथम, तर सातवीत श्रवण ढोरमले (२६२) याने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता आठवीत श्रेया भापकर (२६२) हिने राज्यात १६ वा व जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. नियमित सराव चाचण्या, अभ्यासाचे नियोजन आणि वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, “हे यश शाळेसाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यामुळेच हे शक्य झाले आहे. भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहील,” असा विश्वास व्यक्त केला.या उल्लेखनीय यशामुळे पालकवर्गातून आनंद व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

COMMENTS