Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव नगरपरिषदेत २९ महत्त्वपूर्ण निर्णयविकासकामांना गती; प्लास्टिक बंदीपासून सीसीटीव्हीपर्यंत विविध ठरावांना मंजुरी

कोपरगाव : नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत विविध विभागांतील विकासकामांस

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण

कोपरगाव : नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत विविध विभागांतील विकासकामांसंदर्भात एकूण २९ विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.सभेनंतर बोलताना नगराध्यक्ष संधान यांनी सांगितले की, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू असून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीत पाणीपुरवठा, विद्युत, मार्केट, नगररचना, कर, स्वच्छता व बांधकाम विभागांतील विविध कामांवर चर्चा करण्यात आली. शहरातील जलकुंभांच्या संरक्षणासाठी बार्बड वायर फेन्सिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येसगाव येथील तलावातील जलमापक यंत्राची दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. साठवण तलाव क्रमांक १ ते ४ मधील मत्स्य व्यवसाय ठेका पद्धतीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तलाव परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रलंबित असलेले पाच नंबर तळ्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारास देण्यात आल्या. तसेच शहरातील रस्त्यांवरील अडथळे ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी निश्चित जागा ठरविण्यात येणार असून, यामुळे विद्युत व्यवस्था सुरळीत राहणे, प्रतिमांची विटंबना टाळणे आणि अपघातांची शक्यता कमी करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.याशिवाय नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांबाबत पोटभाडेपट्टा धारकांच्या प्रश्नांवर निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे ठरविण्यात आले. सांडपाणी व्यवस्थापन (एसटीपी) प्रकल्प प्रारूप विकास योजनेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनासाठी इनसिनरेशन प्लांट उभारण्याबाबतही विचार करण्यात आला.नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती व सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या मालमत्ताधारकांना पाच टक्के करसवलत देण्याबाबत चर्चा झाली. स्वच्छता विभागासाठी नवीन जेसीबी व यंत्रसामग्री खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.शहरातील वाढता प्लास्टिक कचरा लक्षात घेता प्लास्टिक प्लेट, कॅरीबॅग व सिल्वर फॉइल प्लेट यांसारख्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अण्णाभाऊ साठे बंदिस्त नाट्यगृह पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.सायलेंस झोन निश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वसाधारण सभेत एकूण २९ निर्णय घेण्यात आले असून, त्यांचे नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. 

COMMENTS