बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मताची लूट केली, कुठल

बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मताची लूट केली, कुठलाही नियम अटी न घालता हे अत्यंत चुकीचे काम केले आता राज्याच्या तिजोरीचे दिवाळे निघाल्यावर कर्मचार्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत ही नाचक्की व्हायला लागली आणि आता सरकारला जागा आली त्यामुळे 81 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले यापूर्वीही 50 लाख लाडक्या बहिणींना वगळले सरकारने केवायसी मोहीम तयार केली आता एक कोटी 66 लाख महिलाच पात्र ठरवल्या प्रारंभी ही योजना जाहीर झाली तेव्हा 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी होत्या 81 लाख बहिणींना वगळले आहे. बहिणींनो तुम्ही फक्त 1500 रुपयासाठी स्वतःचे मूल्यवान मत भाजपाला शिंदे सेनेला व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देऊन स्वतःचे मत विकले आता या सरकारवर फसवणुकीचा 420 चा गुन्हा दाखल करा असे आवाहन लोकनेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.
या योजनेवर राज्य सरकारने 2024 – 2025 मध्ये 32 हजार 470 कोटी रुपये खर्च केले. 2025-2026 ला 30 हजार कोटी खर्च केले दुसर्या वर्षी दोन कोटी कमी खर्च झाला कारण 50 लाख महिलांना सरकारने बोगस नोंदी म्हणून वगळले होते. या योजनेचा लाभ ज्या स्त्रियांचे पती सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांनी घेतला हे कारण दाखवून वगळण्यात आले. याशिवाय ज्यांचे वय 65 वर्ष होते टप्प्याटप्प्याने दर महिन्याला 10 हजार स्त्रियांना बाद केले जाते आता ज्या कर्मचार्यांच्या पत्नीनी लाभ घेतला असे 15000 पेक्षा जास्त लाभार्थी वर कार्यवाही म्हणजे सरकारचे काम वराती मागून घोडे असेच म्हणावे लागेल. फक्त लाडक्या बहिणीच्या मतावर डल्ला मारून सरकार सत्तेत आले या सरकारने राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रपती ने हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केली आहे.

COMMENTS