Homeताज्या बातम्या

मौत कल आती है, आज आ जाए.. डरता कौन है! प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर आ. रोहित पवारांची भावनिक प्रतिक्रिया

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नेते व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि. ३०

दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य;  प्रशासनापुढे पेच
सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार लंके यांचा पाठिंबाजंतर-मंतरवरील उपोषणस्थळी भेट ;  मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही
Ajit Pawar death: Remove Naidu from govt till probe is over, Rohit Pawar  urges PM

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नेते व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि. ३०) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर (Social Media) एक अत्यंत भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करत आपली संघर्षाची भूमिका कायम असल्याचे सूचित केले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांच्या काही प्रसिद्ध ओळी शेअर करत आपली भूमिका मांडली. सत्तेच्या आकर्षणामुळे अनेक जण संघर्षाचा मार्ग सोडत असल्याचे सूचक भाष्य त्यांनी केले. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज असताना अनेक जण सत्तेच्या उबेकडे वळत असल्याची खंतही त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे:

“राह में ख़तरे भी हैं, लेकिन ठहरता कौन है? मौत कल आती है, आज आ जाए… डरता कौन है!

तेरे लश्कर के मुक़ाबिल मैं अकेला हूँ मगर, फ़ैसला मैदान में होगा कि मरता कौन है!!” — राहत इंदौरी

रोहित पवार यांनी आपल्या या संदेशात थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या काही वेळातच आलेली ही प्रतिक्रिया असल्याने हा निशाणा त्यांच्यावरच असल्याचे बोलले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या या भूमिकेकडे विशेष लक्ष वेधले जात असून, आगामी काळात शरद पवार गट जिल्ह्यात कशी फाईट देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

COMMENTS