महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेत मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल बीड तालुक्यातील लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव यांचे सुपुत्र यश जाधव यांचा ग

महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेत मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल बीड तालुक्यातील लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव यांचे सुपुत्र यश जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पोखरी (घाट)चे सरपंच बिभीषण मुळीक, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट तसेच सोमनाथवाडीचे सरपंच किशोर शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविबापू निर्मळ यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अर्जुन घोलप, समीर शेख, जिल्हा परिषद मुख्याध्यापक दीपक घाटे, बाळकृष्ण थोरात, अॅड. गणेश वाणी, अनंतकाका मुळे, गणपत तागड, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, नाना वाणी, औदुंबर नाईकवाडे, सुरज कदम, महावीर जाधव, गोवर्धन मुळे, सर्पमित्र अशोक जाधव, सुखदेव वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश जाधव यांनी हे यश संपादन केले आहे. यापूर्वीही त्यांनी रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन लिंबागणेशचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यातही त्यांच्या हातून अशीच उल्लेखनीय कामगिरी घडो, अशी सद्गुरु चरणी प्रार्थना करून त्यांनी शुभाशीर्वाद दिले.
कुटुंबियांची साथ मोलाची -यश जाधव
सत्काराला उत्तर देताना यश जाधव यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबातील सदस्यांना दिले. त्यांच्या मोलाच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याची ग्वाही देत त्यांनी सत्काराचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

COMMENTS