Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता द्यावी – निवेदनाद्वारे मागणी

शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ब

महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध
महिला आरक्षणाला विरोध करणार्‍या काँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे आंदोलनकाँग्रेसने महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला -डॉ.सारिकाताई क्षीरसागर
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन



शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड शहर व जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या तसेच विद्यार्थ्यांची वाढती शैक्षणिक गरज लक्षात घेता ही मागणी सय्यद इसाक सय्यद युसूफ यांनी केली आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक व सामाजिक ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठीही वैद्यकीय महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती सय्यद इसाक सय्यद युसूफ यांनी केली आहे. या मागणीमुळे बीड शहरातील शिक्षण व आरोग्य क्षेत्राला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS