Homeताज्या बातम्यामनोरंजन

सेन्सॉर बोर्डाच्या नकारानंतर ’72 हुरेन’ चा ट्रेलर रिलीज

सध्या मनोरंजन विश्वातील चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी आणि वाद जास्त होतांना दिसत आहे. आधी पठाण नंतर द केरळ स्टोरी आणि त्यानंतर आदिपुरुष आत

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव
ढाकणी येथील कुस्ती मैदानात पै. गणेश कुंकुले याने पटकावली चांदीची गदा

सध्या मनोरंजन विश्वातील चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी आणि वाद जास्त होतांना दिसत आहे. आधी पठाण नंतर द केरळ स्टोरी आणि त्यानंतर आदिपुरुष आता हा वाद संपत नाही तोच आणखी एक नवा चित्रपटाचा टिझर वादात अडकला. त्या चित्रपटाचे नाव आहे ’72 Hoorain ‘. चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलिज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. धर्मांतरण, दहशतवादी कटस्थान आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉशिंग करुन त्याच्या कडून कशाप्रकारे दहशवादी काम करुन घेतले जाते अशा पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या ‘७२ हुरैन’ या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डाने दणका दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

त्याचवेळी आता या चित्रपटाचा ट्रेलर नाकारल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. आता या निर्णयाविरुद्ध आता चित्रपटाचे निर्मात्याचे हा मुद्दा वरिष्ठांकडे नेणार आहेत.निर्माते म्हणाले की, आम्ही ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवू आणि संबंधित अधिकार्‍यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करू आणि CBFC च्या उच्च अधिकार्‍यांकडून देखील या निर्णयावर स्पष्टीकरण मागणार आहोत. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयानंतर आता चित्रपटाचे निर्मात्यांना 72 हूरेंचा ट्रेलर थिएटरमध्ये दाखवता येणार नाही आहे. आता निर्माते 28 जून रोजी तो डिजिटल पद्धतीने ट्रेलर रिलीज करतील असं बोललं जात आहे.

दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संजय पूरण सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर किरण डागर, गुलाब सिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ओसामा बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांची नावं चित्रपटाच्या टिझरमध्ये समाविष्ट केली आहेत. त्याची झलकही या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसते. आता त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करणाऱ्याला सेन्सॉर बोर्डाने मनाई केल्यामुळे आता निर्माते पुढे काय करतील आणि चित्रपटाच्या प्रदर्शनावर याचा काय परिणाम होईल हे पहावे लागेल.

COMMENTS