Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

https://www.youtube.com/watch?v=uOuLq8GSDeY मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवमहाराष्ट्र दिनाच

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
सुनेत्रा पवारांनी दिला राज्यसभेचा राजीनामा
सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम

मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे महामार्गावरील अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. या अद्भूत आणि नाविन्यपूर्ण आणि कल्पक प्रकल्पाचे शिल्पकार एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विशेष गौरव केला. तसेच यावेळी मान्यवरांनी एमएसआरडीसीच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करत, अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत उत्कृष्ट नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेत पूर्णत्वास नेलेले कार्य यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पामागील अभियंते, तांत्रिक तज्ज्ञ, कामगार आणि प्रशासकीय पथक यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळेच हा जागतिक दर्जाचा प्रकल्प साकार झाला, असेही त्यांनी नमूद करत अनिलकुमार गायकवाड यांचा विशेष गौरव केला.

COMMENTS