Homeताज्या बातम्याअहमदनगर

जामखेडमधील बससेवा सुरळीत; प्रवाशांना दिलासाशिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड : एसटी बस वेळेत सुटत नसल्याने शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, नोकरी करणाऱ्या तसेच इतरकामांनी ये जा करणाऱ्या महिला प्रवाशांची मोठी गैरसोय

संजीवनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ‘अद्विक हाय-टेक’मध्ये नोकरी
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
खा. नीलेश लंके यांना डिस्चार्ज 

जामखेड : एसटी बस वेळेत सुटत नसल्याने शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, नोकरी करणाऱ्या तसेच इतरकामांनी ये जा करणाऱ्या महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तब्बल दोन तास एसटी उशिराने येत असल्याने महिला  वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या मात्र  एसटी प्रशासनाने दखल घेतली नाही.याबाबत माहिती मिळताच शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी  बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट देऊन बस बसच्या वेळेची माहिती घेत प्रवाशांशी संवाद साधून इतर समस्यांची माहितीही जाणून घेतली.जामखेड आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे यांना निवेदन दिले. याशिवाय अहिल्यानगर येथील वाहतूक नियंत्रक रविंद्र जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून समस्या सांगून  बससेवा पूर्ववत वेळेत सुरू करण्याची मागणी केली.  रत्नापूर,पाटोदा,अरणगाव माहिजळगाव कर्जत आदीठिकाणाहून अनेक प्रवासी महिला जामखेड शहरात नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त ये-जा करतात.   बस उशिराने येत असल्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबावे लागत होते.त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. अनेक दिवस संबंधित समस्येबाबत तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.युवा नेते आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि बससेवा सुरळीत वेळेत सुरू झाली. प्रवाशी महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,जामखेड एसटी आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे, वाहतूक नियंत्रक शिवदास उगले, चालक अनिल चौगुले, वाहक वैभव भांगे, विठ्ठल जायभाय, अशोक कुमटकर, दत्तात्रय जगताप, अनिकेत देशमुख तसेच प्रवासी मोनिका सरकाळे, सारिकावारे, दीपाली शेख, अनिता जाधव आदी महिला प्रवासी उपस्थित होते.

COMMENTS