कोपरगाव : स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या ड्राईव्ह साठी मुंबई येथील लूमिव्हिक्टा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने इंटरव्ह्यू द्वारे 20 विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. या कॅम्पस ड्राईव्ह द्वारे बी.सी.एस., बी.बी. ए.- सी. ए., बी.सी. ए., एम.सी.एस., एम.कॉम. बी.कॉम इ. विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण इंटरव्ह्यू च्या बळावर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदांवर आपले नाव कोरले. या शैक्षणिक वर्षात आता पर्यंत एकूण चार ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. त्याद्वारे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्रो.डॉ. रवींद्र जाधव यांनी सांगितले. या ड्राईव्ह साठी लूमिव्हिक्टा कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर यशोदिप शेटे, एच.आर. शैलेश अडकमोल, युवराज सिंग आणि वैष्णवी जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा महाविद्यालयात उभी केली असल्याचे सांगितले. यामध्ये ए.आय. आणि डेटा सायन्स लॅब, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, सुसज्ज लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुविधा व सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती ची सुविधा उपलब्ध आहेत अशीही माहिती रोहमारे दिली.

कोपरगाव : स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या ड्राईव्ह साठी मुंबई येथील लूमिव्हिक्टा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने इंटरव्ह्यू द्वारे 20 विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
या कॅम्पस ड्राईव्ह द्वारे बी.सी.एस., बी.बी. ए.- सी. ए., बी.सी. ए., एम.सी.एस., एम.कॉम. बी.कॉम इ. विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण इंटरव्ह्यू च्या बळावर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदांवर आपले नाव कोरले. या शैक्षणिक वर्षात आता पर्यंत एकूण चार ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. त्याद्वारे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्रो.डॉ. रवींद्र जाधव यांनी सांगितले.
या ड्राईव्ह साठी लूमिव्हिक्टा कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर यशोदिप शेटे, एच.आर. शैलेश अडकमोल, युवराज सिंग आणि वैष्णवी जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा महाविद्यालयात उभी केली असल्याचे सांगितले. यामध्ये ए.आय. आणि डेटा सायन्स लॅब, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, सुसज्ज लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुविधा व सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती ची सुविधा उपलब्ध आहेत अशीही माहिती रोहमारे दिली.

COMMENTS