Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला महाविद्यालयात 18 तास सलग वाचन उपक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीचा जागर

गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 तास सलग वाचन उपक्र

महामानवांचा समतावादी विचार आपण अंगिकारला पाहिजे-आ.विजयसिंह पंडित; गेवराईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिवादन
अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या-आ.विजयसिंह पंडितअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक
बदामराव पंडित,बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली; जळगाव मंजरातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 तास सलग वाचन उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाने या उपक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थिनींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानाचे महत्त्व तसेच वैचारिक साहित्य यांची ओळख व्हावी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या 18 तासांच्या सलग वाचन उपक्रमात भारतीय संविधानासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, कथा, कादंबरी, नाटक तसेच विविध वैचारिक लेखनाचे वाचन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घेतला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमादरम्यान ग्रंथालयातील विविध ग्रंथांची माहिती विद्यार्थिनींना मिळाली तसेच वाचनाचे महत्त्व अधोरेखित झाले. हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा आणि बौद्धिक विकासाला चालना देणारा ठरला, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

COMMENTS