Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्वाने अमरसिंह पंडितांना विधान परिषदेवर संधी द्यावी – बापू गाडेकर

गेवराई : बीड जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व, विकासाचा व्यापक दृष्टिकोन असलेले आणि विधान परिषदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अनुभवी चेहरा म्हणून अमरसिंह पंडित यांना विधानपरिषदेची संधी द्यावी- शेख तय्यब
गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ
अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या-आ.विजयसिंह पंडितअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक
अमरसिंह पंडित - विकिपीडिया

गेवराई : बीड जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व, विकासाचा व्यापक दृष्टिकोन असलेले आणि विधान परिषदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे माजी आ.अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व सभागृहात असणे हि काळाची गरज आहे. अमरसिंह पंडित यांनी आपल्या कारकिर्दीत विशेषतः गेवराई मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. विधान परिषदेत काम करत असताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न केवळ मांडले नाहीत तर ते सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडले. त्यांच्या भाषणांमधील अचूकता आणि प्रश्नांची मांडणी करण्याची पद्धत यामुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. अमरसिंह पंडितांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभे केलेले कार्य आजही सर्वसामान्यांना आधार देणारे ठरत आहे. जिल्ह्यातील रखडलेले सिंचनाचे प्रश्न असोत किंवा रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास असो याविषयी त्यांनी नेहमीच पाठपुरावा करून निधी खेचून आणला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍यांना अशा अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. ज्या नेतृत्वाला प्रशासकीय कामाचा अनुभव व जनतेच्या मुलभूत प्रश्नांची जाण आहे. अमरसिंह पंडित यांनी प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा फायदा मराठवाड्यासह बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने विचार करून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

COMMENTS