Homeताज्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल होताच पोलिसांची मोठी कारवाई! आंदोलनाआधी युवक काँग्रेसचे 4 पदाधिकारी ताब्यात

https://youtu.be/Z8uYXwHR8LU पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. शाह पुण्यात दाखल होताच पोलिसांन

जुनी पेन्शन योजना लागू करा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे
चक्क पोटच्या चिमुकल्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोडून पळाला बाप I LOKNews24
किरीट सोमय्यांनी देशाशी गद्दारी केली ; संजय राऊतांचा आरोप

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. शाह पुण्यात दाखल होताच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या चार पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी आंदोलनाची पोलिसांकडून परवानगी असूनही नोटीस न देता ताब्यात घेतल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे.दरम्यान, अमित शाह आज पुण्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार असून, त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाच्या घोषणेमुळे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दौऱ्यादरम्यान राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS