Homeताज्या बातम्या

फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने

बीड : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात धार्मिक तेढ, अफवा व भीती निर्माण केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यात बीडच्या म

कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे


बीड : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात धार्मिक तेढ, अफवा व भीती निर्माण केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यात बीडच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत कफीलखान जहिरखान (वय 30, रा. अक्सा मशिदीजवळ, शहेनशाहनगर, बीड) यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, 1 एप्रिल 2020 रोजी बीड शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारास व्हॉट्सअ‍ॅपवरून एक आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाली होती. तपासादरम्यान ही पोस्ट कफील खान यांच्या फेसबुक खात्यावरून प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 505(2) अंतर्गत गुन्हा (रजि. क्र. 85/2020) नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शेख इमरान खाजा यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 505(2) अंतर्गत खटला चालविण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 196(1) नुसार सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र ती कायदेशीर परवानगी अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. या महत्त्वपूर्ण युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांचे परीक्षण केले. आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस व कायदेशीर पुरावे सादर करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपी कफीलखान जहिरखान यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात बचाव पक्षात अ‍ॅड. अन्वर शेख, अ‍ॅड. सूर्यकांत पवार, अ‍ॅड. पंकज रायभोळे आणि इबाद शेख यांनी सहकार्य केले.

COMMENTS