Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर पोलिस दलाला नवा चेहरा देणारे नेतृत्व : पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन डॉ. अशोक सोनवणे

अहिल्यानगर : केवळ गुन्हेगारी मोडीत काढणे पोलिसांचे काम नाही, तर व्यवस्था बदलणे, गुन्हेगारी होवूच नये, यासाठी विधायक कामांतून एक नवा संदेश देण्याच

राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
खरातच्या पत्नीने आर्थिक व्यवहाराशी संबंध नाकारलेराहाता न्यायालयात जामिनासाठी सुनावणीवेळी युक्तीवाद


अहिल्यानगर : केवळ गुन्हेगारी मोडीत काढणे पोलिसांचे काम नाही, तर व्यवस्था बदलणे, गुन्हेगारी होवूच नये, यासाठी विधायक कामांतून एक नवा संदेश देण्याचे काम पोलिस खात्याचे आहे. हाच आधुनिक दृष्टीकोन डोळ्यासमोर अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन काम करतांना दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या पोलिस खात्याला नवा चेहरा देऊन लोकभिमूख पोलिसिंगचा नवा प्रयोग ते जिल्ह्यात राबवतांना दिसून येत आहे. यातून सर्वसामान्य जनतेची पोलिसांसोबत असलेली भीती दूर होऊन त्यांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या उमद्या पोलिस अधिकार्‍यांकडून होतांना दिसून येत आहे.
2016 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी मुम्मका सुदर्शन. जन्मभूमी आंधप्रदेशातील कडप्पा जिल्हा असला तरी, त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र. अहिल्यानगर येथे पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी त्यांनी चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यात प्रभावी काम केले. त्यामुळेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूक मध्ये आलेत. खरंतर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, त्यामुळे ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. अशावेळी त्यांनी पोलिस दलात केलेले फेरबदल महत्वपूर्ण ठरतांना दिसून येत आहे. पोलिस खात्याची जबाबदारी केवळ गुन्हे दाखल करणे किंवा गुन्हेगारांना पकडणे इतकीच मर्यादित नसते. समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, नागरिकांचा विश्‍वास संपादन करणे आणि न्यायव्यवस्थेचा प्रभाव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. मुम्मका सुदर्शन यांनी आपल्या कार्यपद्धतीतून हेच तत्त्व प्रत्यक्षात उतरविले आहे. पोलीस ठाण्याच्या दारात न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नागरिकांच्या तक्रारींच्या निपटार्‍यावर भर दिला. तक्रारी प्रलंबित राहू नयेत, सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यांच्या फेर्‍या माराव्या लागू नयेत आणि प्रत्येक प्रकरणाची तातडीने दखल घेतली जावी, यासाठी त्यांनी यंत्रणा अधिक सक्षम केली. त्यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता केवळ कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. कोणाचा फोन, राजकीय हस्तक्षेप किंवा वैयक्तिक दबाव यापेक्षा नागरिकांना न्याय मिळवून देणे अधिक महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी डायल 112 यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून प्रतिसादाची गती वाढविण्यात आली.
गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिका
अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे, मादक पदार्थांची तस्करी आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या घटकांविरोधात त्यांनी कठोर धोरण स्वीकारले. सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवत प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या. टू प्लस योजनेद्वारे हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्यात येत असून, त्यांना वारंवार नोटिसा बजावल्या जात आहेत. कायद्याचा धाक निर्माण करणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे यासाठी त्यांनी कठोरतेबरोबर सातत्यालाही महत्त्व दिले. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात प्रभावी वातावरण निर्माण झाले आहे.
तंत्रज्ञानाधारित आधुनिक पोलीसिंग
बदलत्या काळातील गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याची जाणीव पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी पोलीस दलाला करून दिली. सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, डिजिटल तपास पद्धतींचा अवलंब आणि माहिती संकलनाच्या आधुनिक प्रणालींचा वापर यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढली आहे. आधुनिक साधनांचा वापर करून तपास अधिक वेगवान आणि अचूक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

COMMENTS