Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 व 15 मे 2026 रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालाव

मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
वांद्रे स्थानकाजवळील ‘गरिब नगर’ झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेची मोठी कारवाई; पुढील चार दिवस चालणार पाडकाम मोहीम
कोकणच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते रोह्यात विविध विकासकामांचा शुभारंभ



प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 व 15 मे 2026 रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट (कशरीुंर्रींश) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उष्मालाटीच्या काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. उष्मालाटीच्या काळात काय करावे? तहान नसली तरी भरपूर पाणी प्या. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, लस्सी, भाताची पेज यांसारखे द्रवपदार्थ घ्या. हलक्या रंगाचे, सैलसर सुती कपडे वापरा. बाहेर जाताना डोके झाका, टोपी, छत्री किंवा कापड वापरा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापरा. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या. काय टाळावे? दुपारी 12 ते 3 दरम्यान उन्हात जाणे टाळा. उन्हात श्रमाची कामे करू नका. चहा, कॉफी, शीतपेये व मद्यपान टाळा. तेलकट, तिखट व जास्त मिठाचे पदार्थ खाऊ नका. चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नका. शिळे अन्न सेवन करू नका. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS