Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

रुचिरा बेटकर यांना पुण्याचा विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार जाहीर

येथील संवेदनशील कवयित्री रुचिरा बेटकर यांच्या  कोलाज भावनांचा   या कवितासंग्रहाला पुणे येथील विश्वबंधुता प्रकाशदूत उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आज ज

राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन



येथील संवेदनशील कवयित्री रुचिरा बेटकर यांच्या  कोलाज भावनांचा   या कवितासंग्रहाला पुणे येथील विश्वबंधुता प्रकाशदूत उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आज जाहीर झाला आहे. पुणे येथे येत्या 2 जून रोजी विश्वबंधुता साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
कोलाज भावनांचा  या कवितासंग्रहातून मानवी मनातील संवेदना रुचिरा बेटकर यांनी टिपल्या आहेत. सामाजिक समस्यांचे भानही त्यांनी या कवितासंग्रहातून जपले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कविता लेखनाबद्दल विश्वबंधुता साहित्य परिषद , विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती आणि काषाय प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाज भावनांचा या कवितासंग्रहाची ’ विश्वबंधुता प्रकाशदूत 2026’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. 2 जून रोजी पुणे येथे कविवर्य प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या विश्वबंधुता साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रुचिरा बेटकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

COMMENTS