Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे

माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात सर्वच शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची फरफट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.लहान मोठी कामे व अनेक प्रकारच्

पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराज नगरमध्ये एकाची गळफास
कोरोना आपत्ती आणि गृहमंत्रीपदाचा देशमुख यांचा राजीनामा l Lok News24
कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात सर्वच शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची फरफट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.लहान मोठी कामे व अनेक प्रकारच्या समस्या घेऊन शहर व तालुक्यातील नागरिक शासकीय कार्यालयात हेलपाटे मारतांना आढळतात त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांनी आपल्या कडे कोणतेही काम घेऊन येणार्‍या नागरिकांची हेळसांड न करता नियमात राहून संबंधित व्यक्तीचे कामे सामाजिक भावनेचा विचार करत तत्काळ करावी त्यांना उगाच चिरी-मिरी साठी हेलपाटे मारायला लावू नये असे मत कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

वहाडणे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, खेड्यापाड्यातून तालुक्यातील शासकीय कार्यालयात कामांसाठी येणार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.काही कार्यालयांभोवती तर दलालांचे जाळेच निर्माण झालेले आहे.रेशन कार्ड बाबतच्या साध्या-किरकोळ कामासाठीही हेलपाटे मारून लोक वैतागून जातात.बहुतांश शासकीय कार्यालयात अशीच अवस्था आहे.अनेकदा पैशांसाठी कामांची टाळाटाळ केली जाते.काही अधिकारी-कर्मचारी व काही दलाल संगनमताने ही आर्थिक लुट करतांना दिसतात.वारंवार चकरा माराव्या लागू नयेत म्हणून लोक नाईलाजाने पैसे देऊन काम करून घेतात.काही कार्यालयात सामान्य जनतेशी सौजन्याने न बोलता उर्मटपणाची भाषा वापरली जाते. अशावेळी तक्रार घेऊन जायचे कुणाकडे असा प्रश्‍न जनतेपुढे निर्माण होतो. समाजसेवक म्हणून मिरविणारे अनेकजण अधिकार्‍यांचे खबरे म्हणूनच काम करतात.असे समाजसेवक कधीही अधिकारी-कर्मचारी यांच्याविरोधात बोलणार नाहीत.केवळ फोटो-बातम्या-मेसेज सत्कार-प्रसिद्धी यातच अनेकजण मग्न आहेत.खबरे म्हणून काम करणार्‍या काही समाजसेवकां पासूनही सावध राहणे गरजेचे आहे. यानिमित्ताने मी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जाहीरपणे इशारा देतो कि, सर्वप्रकारच्या कागदपत्रांची योग्य पुर्तता असूनही केवळ पैशांसाठी कुणाची अडवणूक केली तर त्याचे वाईट परिणाम होतील हे ध्यानात घ्या.योग्य काम करणार्‍यांचा सन्मानच ठेवला जाईल.पण सामान्य जनतेची फरफट करणार्‍यांना धडा शिकविला जाईल यात कुणीही शंका बाळगू नये असा इशारा वहाडणे यांनी दिला आहे.

लाचखोर अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करावी – लाखो रुपये पगार असणारे व जुनी पेन्शन ाठी जनतेला वार्‍यावर सोडणारे सामान्य नागरिकांकडून चिरी-मिरीची अपेक्षा बाळगणार्‍या लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍याविरुद्ध कडक कारवाई करण्यासंदर्भात शासनाने योग्य ते पावले उचलत वाढता भ्रष्टाचार संपुष्टात आणत लाचखोर अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करत नोकरीतुन कायमचे बडतर्फ करत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करायला हवी.

COMMENTS