Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा

कांद्याच्या माळा घालून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

शिर्डी प्रतिनिधी ः येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने शेतकर्‍याच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य मोर्चा काँग्रेसचे माजी आम

खडकी आगीच्या दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून द्या
अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे संसार पाण्यात
पत्रकार वारीशे यांच्या हत्येचा राहुरी पत्रकार परिषदेने केला निषेध

शिर्डी प्रतिनिधी ः येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने शेतकर्‍याच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य मोर्चा काँग्रेसचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून राज्यातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा सद्यस्थितीत दुष्काळग्रस्त परिस्थितीतून जात आहे. खरिप हंगामात कमी पावसामुळे नापिकी तर निष्क्रीय सरकारमुळे मालाला भाव नाही. रब्बीची लागवड ही केवळ 28% एवढीच झालेली आहे. केंद्रातील व राज्यातील भ्रष्ट सरकारच्या नाकर्तेपणामुळे एकेकाळी देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा आत्महत्येस प्रवृत्त होत असून आपले अवयवही विकायला निघाला आहे. सरकारच्या क्रूर आयात, निर्यात धोरणामुळे कापूस, कांदा, उस, द्राक्ष, सोयाबीन, संत्रा, टोमॅटो, कडधान्य उत्पादक शेतकरी हतबल झालेला आहे. शेतकर्‍याने घाम गाळून कष्टाने तयार केलेल्या मालाच्या विक्री वेळी आयात वाढवून भाव पाडायचे व व्यापार्‍याने साठमारी केल्यानंतर भाव वाढवायचे अशा प्रकारचे धोरण शासनाचे भांडवलदारांच्या संगनमताने सुरू आहे. त्यात कष्टकरी, शेतकरी, हातमजूर मायबापाचे कंबरडे मोडायचे काम सरकार करत आहे. शेतकरी बंधुंना एक रुपयात मिळणार्‍या विम्याचे काय झाले? शासनाने 66 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना देऊन सुद्धा शेतकरी विम्यापासून आजही वंचितच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.  सोयाबीन 7 हजार रुपये, कापूस 13 हजार रुपये, भात 4000 रुपये, मका 25,000 रुपये यांसह अन्य पिकांना योग्य हमीभाव देऊन शासनाने खरेदी केंद्र त्वरीत सुरु करावीत. शेतकर्‍यांना सर्व पिकांसाठी बोनस हेक्टरी 30 हजार देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार सुधीर तांबे, सचिन गुजर, प्रभावती ताई घोगरे, सुनील थोरात शिर्डी विधानसभा नेते, कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश नगरे, संगमनेर तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे, शिर्डीचे माजी नगरसेवक सचिन चौगुले, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, महिला उपजिल्हाध्यक्ष शितल लहारे, अविनाश शेजवळ,मुन्नाभाई फिटर, आधी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी – दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी.इथेनॉल निर्मिती बंदी त्वरित उठवावी. सर्व जिल्ह्यांत सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना विशेष पॅकेज देण्यात यावे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकर्‍यांना संपूर्ण विमा रक्कम ताबडतोब देण्यात यावी आणि विमा कंपन्यांकडून होणारा मानसिक व आर्थिक छळ थांबवावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

COMMENTS