Homeताज्या बातम्या

शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन

बीड: विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत अ

एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयात अजितदादा पवार यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवेचे आवाहन
बेलापूर ग्रामपंचायत आयोजित शिबिरास तहसीलदारांची भेट; अडीच हजार मतदारांनी घेतला लाभ
पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; भविष्यात चर्चा झालीच तर ती फक्त PoK वरच होणार: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बीड: विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना शिक्षक व प्राध्यापक संघटनांचे मौन आश्चर्यकारक असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार, लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. नंदकुमार उघाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

डॉ. उघाडे यांनी म्हटले आहे की, विविध शिक्षक संघटनांनी आजपर्यंत वेतनवाढ, जुनी पेन्शन योजना, पदोन्नती, अनुदान, संचमान्यता आदी स्वतःच्या स्वार्थाच्या प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलनांचा मार्ग अवलंबला. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रश्नांवर त्या अपेक्षित भूमिका घेताना दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी समोर आल्या, तरी शिक्षक संघटनांनी याविरोधात प्रभावी आवाज उठविल्याचे फारसे दिसून आले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला साहित्यिक, कलाकार, पर्यावरणवादी आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असताना शिक्षक संघटना मात्र मौन बाळगून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात संघटनांनी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट (NEET) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर उपोषण केले असतानाही कोणतीही शिक्षक किंवा प्राध्यापक संघटना त्यांना भेटली नसल्याचा उल्लेख करत, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सच्चे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी विविध विद्यार्थी आंदोलने झाली असली, तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाकडे पाहण्याची प्रशासनाची भूमिका अधिक कठोर असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सामाजिक न्याय आणि शैक्षणिक व्यवस्थेतील बदलाची नांदी ठरू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि शिक्षक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांना शिक्षक संघटनांनी तात्काळ पाठिंबा द्यावा, असे आवाहन डॉ. नंदकुमार उघाडे यांनी पत्रकाच्या शेवटी केले आहे.

COMMENTS