Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेक कोल्हे १४ मे रोजी घेणार विधान परिषदेत शपथ

 कोपरगाव : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाकडून युवा, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांची विधान परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोपरगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्व नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवार (दि. १४ मे) रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील विधान भवनात पार पडणार आहे. यावेळी विवेक कोल्हे हे विधान परिषद सदस्य म्हणून अधिकृतपणे शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने त्यांच्या निवडीकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.विवेक कोल्हे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागाचा विकास, शेती, शिक्षण, युवकांचे प्रश्न आणि रोजगार यांसारख्या विषयांना विधान परिषदेत त्यांच्या माध्यमातून प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हे समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विधान परिषदेतील सर्व नवनियुक्त सदस्यांसह विवेक कोल्हे यांच्या शपथविधीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार  
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
चांभुर्डी गावाने जतन केला मराठेशाहीचा जिवंत इतिहासबुरुज, देवडी आणि दगडी पायऱ्यांसह ऐतिहासिक ‘वेस’ आजही सुस्थितीत

COMMENTS