कर्जत : कर्जत नगरपंचायतमधील नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून मंगळवारी शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर बुधवारी (दि. १३) विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला.हा रूट मार्च कर्जत पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन मुख्य बाजारपेठ, मेन रोड, कापरवाडी वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच महात्मा फुले चौक या प्रमुख भागांतून काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सहभागी झाला होता.अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुणीही अफवा पसरू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करू. – प्रवीण लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी.

COMMENTS