Homeताज्या बातम्याअहमदनगर

कुकडीत पाणी, तरी शेती तहानलेली ! नियोजनाअभावी श्रीगोंद्यातील फळबागा संकटात; शेतकऱ्यांचा संताप

श्रीगोंदा :  एकीकडे प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेती संकटात सापडली असताना दुसरीकडे कुकडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असूनही लाभधारक शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेषतः फळबागा अक्षरशः जळण्याच्या मार्गावर असून अनेक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीगोंदा बाबुर्डी रोडवरील गट नंबर ४२ येथे लिंबू फळबाग असलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या बागेची पाहणी करण्यासाठी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना खुले निमंत्रण दिले आहे. “उष्णतेमुळे आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे फळबागांचा अक्षरशः शेवट सुरू आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.संबंधित शेतकरी हे स्वतः पाणी वापर संस्था ‘सावता माळी’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, “जर मला स्वतःलाच एवढ्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सामान्य शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट असेल याची कल्पना करणे कठीण आहे,” असे त्यांनी सांगितले.त्यांच्या म्हणण्यानुसार, कुकडी धरणामध्ये सध्या सुमारे साडेपाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा प्रकल्प दुष्काळी परिस्थितीत पाच ते सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना जगवण्याचे काम करतो. मात्र पाणी वाटपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे शेतीला अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.“कुकडी प्रकल्पामुळे शेतकरी जिवंत राहतो, पण पाणी वाटप करणारे अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींना नियोजनच करता येत नाही. त्यामुळे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.शेतमालाला मिळणारा कमी दर आणि पाण्याचा तुटवडा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडत चालल्याचे चित्र आहे.“आज कांद्याला अवघा ५० पैसे किलो दर मिळतोय. उत्पादन खर्च वाढतोय, पण शेती टिकवण्यासाठी आवश्यक पाणीही वेळेवर मिळत नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुकडी प्रकल्पांतर्गत लाभधारक असलेल्या अनेक पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा झालेला नाही. “आत्तापर्यंत पाणी असूनसुद्धा १३२ पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणी मिळाले नाही. यामुळे अनेक फळबागा कोमेजत आहेत,” असा आरोप करण्यात आला.सध्या वाढत्या तापमानामुळे लिंबू, डाळिंब, मोसंबी आदी फळबागांना मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी झाडांची पाने गळणे, फळे जळणे आणि उत्पादन घटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन करून शेती वाचवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कुकडी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे तातडीने योग्य नियोजन करावे, अन्यथा तालुक्यातील हजारो एकर फळबागा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फळबागांना मोठा फटका – लिंबू बागांची पाने गळू लागली – डाळिंब फळे जळण्याचे प्रमाण वाढले – मोसंबी उत्पादन घटण्याची भीती – उष्णता आणि पाण्याअभावी झाडे कोमेजली

इथेनॉल हे इंधनाला सर्वोत्तम पर्यायमाजी मंत्री थोरात ; थोरात कारखान्यातून दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा सत्कार

श्रीगोंदा :  एकीकडे प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेती संकटात सापडली असताना दुसरीकडे कुकडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असूनही लाभधारक शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेषतः फळबागा अक्षरशः जळण्याच्या मार्गावर असून अनेक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीगोंदा बाबुर्डी रोडवरील गट नंबर ४२ येथे लिंबू फळबाग असलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या बागेची पाहणी करण्यासाठी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना खुले निमंत्रण दिले आहे. “उष्णतेमुळे आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे फळबागांचा अक्षरशः शेवट सुरू आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.संबंधित शेतकरी हे स्वतः पाणी वापर संस्था ‘सावता माळी’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, “जर मला स्वतःलाच एवढ्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सामान्य शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट असेल याची कल्पना करणे कठीण आहे,” असे त्यांनी सांगितले.त्यांच्या म्हणण्यानुसार, कुकडी धरणामध्ये सध्या सुमारे साडेपाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा प्रकल्प दुष्काळी परिस्थितीत पाच ते सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना जगवण्याचे काम करतो. मात्र पाणी वाटपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे शेतीला अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.“कुकडी प्रकल्पामुळे शेतकरी जिवंत राहतो, पण पाणी वाटप करणारे अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींना नियोजनच करता येत नाही. त्यामुळे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.शेतमालाला मिळणारा कमी दर आणि पाण्याचा तुटवडा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडत चालल्याचे चित्र आहे.“आज कांद्याला अवघा ५० पैसे किलो दर मिळतोय. उत्पादन खर्च वाढतोय, पण शेती टिकवण्यासाठी आवश्यक पाणीही वेळेवर मिळत नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुकडी प्रकल्पांतर्गत लाभधारक असलेल्या अनेक पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा झालेला नाही. “आत्तापर्यंत पाणी असूनसुद्धा १३२ पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणी मिळाले नाही. यामुळे अनेक फळबागा कोमेजत आहेत,” असा आरोप करण्यात आला.सध्या वाढत्या तापमानामुळे लिंबू, डाळिंब, मोसंबी आदी फळबागांना मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी झाडांची पाने गळणे, फळे जळणे आणि उत्पादन घटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन करून शेती वाचवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कुकडी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे तातडीने योग्य नियोजन करावे, अन्यथा तालुक्यातील हजारो एकर फळबागा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फळबागांना मोठा फटका

– लिंबू बागांची पाने गळू लागली

– डाळिंब फळे जळण्याचे प्रमाण वाढले

– मोसंबी उत्पादन घटण्याची भीती

– उष्णता आणि पाण्याअभावी झाडे कोमेजली

COMMENTS