Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगावची लेक पुन्हा अव्वल!किरण नरवडे सलग दुसर्‍या वर्षी कॉलेजमध्ये प्रथम

माजलगाव तालुक्यातील हुशार आणि जिद्दी कन्या किरण नरवडे हिने पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा उंचावला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ,

बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
जंतरमंतरवरील पोलिस कारवाईचा निषेध; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीडमध्ये आंदोलन
पालवनधाम दिंडीचे भक्तिमय प्रस्थानविठ्ठलनामाच्या गजरात शेकडो वारकरी देहूकडे रवाना



माजलगाव तालुक्यातील हुशार आणि जिद्दी कन्या किरण नरवडे हिने पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा उंचावला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने 76.04% गुण मिळवत आपल्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसर्‍या वर्षीही तिने हा मान पटकावत आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
गेल्या वर्षीही किरणने प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदाही तीच परंपरा कायम ठेवत तिने आपल्या यशाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. कोल्हापूर आणि सांगलीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या भागांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत माजलगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. किरणच्या या घवघवीत यशामुळे बीड जिल्हा आणि माजलगाव तालुक्याचा मान उंचावला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षकवर्ग, मित्रपरिवार आणि नरवडे कुटुंबीयांनी तिच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या किरणने मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. किरण नरवडेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून तिच्या पुढील शैक्षणिक प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यश संपादन करून माजलगावचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS