Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळंबी येथे विजेच्या तारा येतायत हाताला; शेतकर्‍यांचे जीव मुठीत घेऊन कामकाज; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

अनेकवेळा सांगूनही शेतकर्‍यांना न्याय मिळत नसेल तर भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.अधिक सावंत (भारतीय मराठा महासंघ श

मौजे वेळे गावाच्या पुनर्वसनाबाबत 63 खातेदारांनी संपर्क साधावा
मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; 24 कोकरांचा मृत्यू; 7 कोकरे जखमी; 4 कोकरे लंपास
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

अनेकवेळा सांगूनही शेतकर्‍यांना न्याय मिळत नसेल तर भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
अधिक सावंत (भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष
)

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील कळंबी येथील सगरे कुटुंबियांच्या क्षेत्रात चालू विजेच्या तारा लोंबकळत असून त्या सहजपणे हाताला येत आहे. त्यामुळे वारंवार तोंडी तसेच लेखी सांगूनही महावितरणकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, कळंबी येथील शरद सगरे, बजरंग सगरे यांच्या गट नं 372 मध्ये दोन विजेच्या पोलच्या मधोमध तारा लोंबकळत असून त्या तारा सहजपणे हाताला येत आहेत. तसेच या तारांमुळे शेतातील मशागत करताना वारंवार अडचण येत आहे. ट्रॅक्टरच्या हुडाला सहजपणे थटत असल्याने दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
येथील शेतकर्‍यांनी औंध, पुसेसावळी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात निवेदन देऊनही अजून काहीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी तारांना ताण देण्याची मागणी होत आहे.

COMMENTS