Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

बीडमध्ये सामाजिक संस्थांची बैठक संपन्न

बीड येथील शासकीय विश्रामगृहात सामाजिक संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. ही बैठक सकाळी 11:30 ते दुपारी 4:00 या वेळेत पार पडली. बैठ

गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणार्‍या सभेत फुले जयंती उत्साहात; बारुळकरांना श्रद्धांजली
17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद
मुख्याध्यापकांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; विद्यार्थ्यांना ‘एक्झाम पॅड’चे वाटपसामाजिक कार्यकर्ते मुसाखान पठाण व शेख वसीम यांचा आदर्श उपक्रम



बीड येथील शासकीय विश्रामगृहात सामाजिक संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. ही बैठक सकाळी 11:30 ते दुपारी 4:00 या वेळेत पार पडली. बैठकीदरम्यान महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. बैठकीची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या कार्याचा परिचय करून दिला तसेच समाजहिताच्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती मांडली.या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे बीड जिल्हा समता कृती समिती या नवीन समितीची स्थापना. सर्व उपस्थितांच्या एकमताने समितीची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे – अध्यक्षपदी शाहीन असलम पठाण यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी रुक्मिणी नागापुरे,उपाध्यक्ष  तसलीम इनामदार  उपाध्यक्ष  किसकिंदा चौरे,उपाध्यक्ष    
शैला नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली  समितीच्या सदस्यपदी अनिता कांबळे,रत्नमाला गायकवाड, सत्यभामा सौंदरमल, रुपाली मारुती कुटे, अंजूम पठाण, शकुंतला घुंगासे, हर्षानी लक्ष्मण शिंदे, नागेश शिंदे, बाबासाहेब कोकाटे, लक्ष्मण हजारे,दिलीप हनुमंतराव पाटील, शेख आमेर पाशा आणि विनोद शिंदे यांची निवड करण्यात आली.बैठकीत सामाजिक समता, संघटनात्मक बळकटीकरण आणि विविध समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.उपस्थितांनी नव्याने स्थापन झालेल्या समितीमार्फत समाजहितासाठी प्रभावी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

COMMENTS