Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नगर-मनमाड रोडवर रास्ता रोको

राहाता /प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या गेट समोरील

लॉकडाऊन उपाय नाही”: प्रकाश आंबेडकर |
कोतुळमधील श्री वरदविनायक मंदिरात अथर्वशीर्षचे पठण
राहाता बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्‍वर गोंदकर

राहाता /प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या गेट समोरील नगर-मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन करत, कांद्याला योग्य भाव द्यावा. यासाठी एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.

या रास्ता रोको आंदोलनात शेतकरीवर्गानी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. कांदा पिकून सुद्धा योग्य भाव मिळत नाही. कांदा उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याला मिळत असलेला भाव यांचा काही ताळमेळ लागत नाही. उत्पन्न खर्च ज्यादा तर मिळत असलेला भाव हा कमी आहे. त्यातच आता केंद्र सरकारने निर्यात 40 टक्क्यांनी वाढवली आहे. आज शेतकर्‍यांना 24 तास लाईट मिळत नाही. जी मिळती ती रात्री मिळते. ती पण कमी दाबाने असते. रात्री पिकांना पाणी भरणे हे जीव मुठीत धरून पाणी भरावे लागते. कारण रात्री हिंस्र प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती असते. त्यासाठी सरकारने सकाळी लाईट द्यावी. काल कांद्याला 2,200/- ते 2,500 /- रूपये भाव होता. तर आज त्याच कांद्याला सोळाशे रूपये भाव मिळत आहे. एका दिवसामध्ये असे काय झाले ते की सुमारे 1,000/- ते 1,200/- रुपये कमी मिळत आहे. त्याला कारण केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवले. एकीकडे सरकार म्हणते हे शेतकर्‍यांचे सरकार आहे. तर दुसरीकडे त्याच शेतकर्‍यांच्या पिकांना सरकार योग्य भाव देत नाही. एक ते दीड तास चाललेल्या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची तहसीलदार अमोल मोरे यांनी भेट घेतली.त्यांनी शेतकर्‍यांच्या भावना समजून घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. एक ते दीड तासानंतर शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन थांबविले.

COMMENTS