Homeताज्या बातम्या

कुंटूर हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 11 जण ताब्यात, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर शेतशिवारात सुरू असल

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Navi Mumbai : महिला डॉक्टर असल्याचा बनाव करत सोनाराची लूट (Video)
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू



नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बिलोली उपविभागीय पोलीस पथकाने धाड टाकून 11 जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 5 लाख 2 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे राहेर येथील शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर ’तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांची एकच धांदल उडाली. पोलिसांनी घटनास्थळीच 11 आरोपींना ताब्यात घेतले. या धाडीत आरोपींकडून 54 हजार 450 रुपयांची रोख रक्कम, सुमारे 87 हजार रुपये किमतीचे 10 अँड्रॉइड मोबाईल फोन, सुमारे 3 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली तसेच तिर्रट जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5 लाख 2 हजार 450 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 170/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 12(अ) अन्वये सर्व 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुंटूर पोलीस करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, पोलीस उपनिरीक्षक तिडके तसेच पोलीस कॉन्स्टेबल अंबोरे आणि कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध जुगार, मटका, तिर्रट किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर धंद्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, तसेच अशा अवैध कृत्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.

COMMENTS