Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्‍नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा

पिंपरी येथे शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क निर्मितीसाठी ड्रम वाटप
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा


मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर मोर्चा नेण्याची तयारी आंदोलकांनी केली होती. मात्र गिरगाव चौपाटी परिसरातच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवून धरपकड सुरू केली. या मोर्चाला अधिकृत परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी शेतकरी आणि विविध पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचा पाठिंबा होता. आंदोलनात विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा पर्याय नाकारत थेट मुख्यमंत्री निवासस्थानावर जाण्याचा आग्रह धरला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. राजू शेट्टी यांनी पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍यांचा आवाज दाबण्याचा आरोप केला. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना पोलिसांनी दमदाटी करून ताब्यात घेतले. शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणे चुकीचे नाही, असे ते म्हणाले.
शेट्टी यांनी पुढे बोलताना कोकणातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कोकण दौर्‍यावर येऊनही शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत, साधे निवेदन स्वीकारायलाही वेळ दिला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला. मोठ्या आशेने मुंबईत आलेल्या शेतकर्‍यांवर पोलिसी कारवाई करण्यात आल्याने संताप वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS