Homeव्हिडीओ

पिंपरी येथे शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क निर्मितीसाठी ड्रम वाटप

https://youtu.be/jzWIKI6AkIs पिंपरी (ता. खुलताबाद) येथे दिनांक 19/06/2026 रोजी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 200 लिटर क्षमते

जलसंपदा कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाला न्यायालयाची मान्यतागोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाविरोधातील याचिका फेटाळली
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा

पिंपरी (ता. खुलताबाद) येथे दिनांक 19/06/2026 रोजी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 200 लिटर क्षमतेचे ड्रम वाटप करण्यात आले. या ड्रमचा उपयोग दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे समूह सहाय्यक वैभव सोने सर यांनी शेतकऱ्यांना ड्रमचे वाटप केले तसेच दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचे फायदे व पिकांच्या संरक्षणासाठी त्याचा उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमात अलका बारगळ व उज्वला महेर यांचे सहकार्य लाभले. त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठांचा वापर, बचत व शेतीतील उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जैविक कीड नियंत्रण साधने उपलब्ध होऊन शेती उत्पादन वाढीस मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.

COMMENTS