Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणांची कामे तातडीने पूर्ण कराखा. डॅा. गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठकीत मंत्री राठोड यांचे निर्देश

 जिल्ह्यातील सर्व  तालुक्यातील पाझर तलाव, सिंचन तलाव व मालगुजारी तलाव यांचे गाळ काढून तलावांची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकर

खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी



 जिल्ह्यातील सर्व  तालुक्यातील पाझर तलाव, सिंचन तलाव व मालगुजारी तलाव यांचे गाळ काढून तलावांची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरण करुन सिंचन क्षमता वाढविणे व पावसामुळे कुठेही शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबधित यंत्रणेला दिले. खा . डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 मे 2026 रोजी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी ना. राठोड हे निर्देश दिले.
आयोजित बैठकीत नांदेड जिल्ह्यातील जलसंधारण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील सर्व तलावांची दुरुस्ती व नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी खा. डॅा. गोपछडे यांनी बैठकीत केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री राठोड यांनी मंत्रालयीन अधिकारी तसेच नांदेड जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी यांना कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या तसेच कामात कुठेही हलगर्जीपणा केला तर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा दिला. पुराच्या पावसामुळे कुठेही शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचनाही ना. राठोड यांनी दिल्या आहेत. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS