Homeताज्या बातम्या

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचा ’उद्योगरत्न’ पुरस्कार वैजनाथअप्पा कोल्हे यांना प्रदान; संघर्ष, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा गौरव

परळी वैजनाथ: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स व नांदेड जिल्हा आडत व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या वर्धापन दिन सोह

अंबाजोगाईत एमएसईबीचा डोळे असून आंधळा कारभार! नगरपरिषद परिसरातील डीपीवरील अतिरिक्त भारामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुल गोशाळेत गोवंशांना चारा वाटप; इर्शादभाई यांच्या उपक्रमाचे कौतुक
दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वरची ‘नीट’मध्ये घवघवीत कामगिरी; ५९० गुण मिळवत मिळवले उल्लेखनीय यश
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स यांचा २८ वा वर्धापन दिन व व्यापारी परिषद  उत्साहात संपन्न. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.., #MarathwadaChamber  #28thAnniversary #VyapariParishad ...

परळी वैजनाथ: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स व नांदेड जिल्हा आडत व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या वर्धापन दिन सोहळा व मराठवाडा व्यापारी परिषद कार्यक्रमात परळी वैजनाथ येथील यशस्वी उद्योजक श्री वैजनाथअप्पा लक्ष्मणअप्पा कोल्हे यांना प्रतिष्ठेचा ’उद्योगरत्न’ पुरस्कार रविवारी थाटामाटात प्रदान करण्यात आला.

या मानाच्या सोहळ्यास मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष श्री आदेशपालजी छाबडा अध्यक्षस्थानी उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर (मुंबई) चे अध्यक्ष श्री रविंद्रजी मानगणावे, उपाध्यक्ष श्री सुनीलजी किर्दक, सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ श्री राहुलजी हिंगमिरे तसेच गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, उद्योजक संदीपसेठ लाहोटी, सोनार समाजाचे नेते सुरेश टाक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुरेशराव मुंडे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष विलासराव ताटे, रमाकांतअप्पा निर्मळे यांच्यासह परळी शहरातील शेकडो व्यापारी, नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर उभारलेले ’शिवम् सुपर मार्केट’ आज परळी वैजनाथ शहरातील विश्वासार्ह व्यावसायिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. बालवयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत किराणा व्यवसायातील तब्बल १६ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर श्री कोल्हे यांनी १९९६ मध्ये छोट्या स्वरूपात व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर २००८ मध्ये ’शिवम् सुपर शॉपी’ आणि २०२५ मध्ये अत्याधुनिक ’शिवम् सुपर मार्केट’ उभारून त्यांनी उद्योजकतेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

प्रभू श्री वैद्यनाथ भगवान व श्री तिरुपती बालाजी यांच्यावरील त्यांची निस्सीम श्रद्धा आणि निस्वार्थ सेवाभावामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला, ग्राहकनिष्ठेला, सामाजिक बांधिलकीला आणि उद्योजकीय कार्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला असून परळी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री वैजनाथअप्पा कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS