Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढोरसडे शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद दहिगाव-ने गटातील ढोरसडे जिल्हा परिषद शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पहिलीतील वि

संत गोदड महाराजांच्या नगरीत अतिरेक चालत नाही : आ. प्रा. राम शिंदे
स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा कोपरगावात शुभारंभ
बेट भागाच्या विकासात आमदार काळेंचे मोठे योगदान ः सचिन परदेसी

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद दहिगाव-ने गटातील ढोरसडे जिल्हा परिषद शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पहिलीतील विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ढोरसडे गावचे लोकनियुक्त सरपंच माऊली निमसे पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ माळवदे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राम काळे, पत्रकार दत्ता माळवदे, सुनील वखरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक करत असलेल्या कामाचे कौतुक निमसे यांनी केले. शाळेमध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे शाळेकडील ओढ निर्माण करण्यास शिक्षक करत असलेल्या कार्याची प्रशंसाकरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासही मदत केली जाईल. जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक हे विद्यार्थी जीवनाचा पायाभरणी करत असतात त्यामुळे त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही पालकांची असते ती पूर्ण केली जाईल. असेही त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यासह शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले. तर शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक शंकर वारुळे, मोहन पाऊलबुद्धे व प्रज्ञा वाघमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या उत्साही वातावरणामुळे कार्यक्रमात अधिक रंगत वाढत गेली.

COMMENTS