Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात अवैध देशी दारू विक्री विरोधात उपोषणाचा इशारा

शेवगाव : तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा : आ. आशुतोष काळे
गौतम सहकारी बँकेस चार कोटींचा नफा  
वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या;एरंडगाव समसूद येथील घटना; बहिणीवरही जीवघेणा हल्ला

शेवगाव : तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेवगाव शहरातील काही ठिकाणी परवानगी नसताना देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. यामुळे परिसरातील तरुणांवर वाईट परिणाम होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः शिवाजीनगर भागात ही विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 काळे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायावर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात येत्या २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत राज्य उत्पादन शुल्क मंत्री, जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आली असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS