Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईल कंपनीकडून कुडाळ ग्रामपंचायतीला एक लाख नव्वद हजार पाचशे रुपायाची भरपाई

कुडाळ / वार्ताहर : कुडाळ गावामध्ये अनेक दिवसापासून मोबाईल कंपनीच्या माध्यमातून खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू होते. यामध्ये गावातील रस्ते, गटारे,

महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश
विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन
संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

कुडाळ / वार्ताहर : कुडाळ गावामध्ये अनेक दिवसापासून मोबाईल कंपनीच्या माध्यमातून खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू होते. यामध्ये गावातील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाईपलाईन, साईटपट्टी खराब होत होत्या. माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी संबंधित काम बंद करून ठेकेदार व सुपरवायझर यांना ग्रामपंचायतीच्या परवानगीबाबत विचारणा केली. तसेच विनापरवाना झालेल्या कामामुळे गावचे झालेल्या नुकसानभरपाई कंपनीला देण्यास भाग पाडले. यांच्या सतर्कतेमुळे व प्रयत्नातून कुडाळ ग्रामपंचायतीला एक लाख नव्वद हजार पाचशे रुपयचा निधी मिळाला.
कुडाळ गावामध्ये अनेक दिवसापासून खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू होते. यात गावातील रस्ते, गटारे,पिण्याच्या पाईपलाईन साईटपट्टी खराब झाल्याची बाब माजी सरपंच विरेंद्र शिंदे येताच लक्षात त्यांनी काम बंद करून ठेकेदार व सुपरवायझरांना ग्रामपंचायतीची कामाच्या परवानगी संदर्भात विचारणा केली असता परवानगी नसल्याचे अडळून आले. याबाबत काम बंद करण्याच्या सुचना देऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. यावर संबंधित ठेकेदार यांनी मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करून माहिती दिली. मात्र, ग्रामपंचायतीची परवानगी घेतली पाहिजे हे सांगितल्यावर संबंधित अधिकार्‍यांनी ही गावचे झालेल्या नुकसानभरपाईसाठी एक लाख नव्वद हजार पाचशे रुपये या रक्कमेचा धनादेश ग्रामपंचायत कुडाळ या नावाने काडून सहकार्य करीत परवानगी घेऊन पुढील काम चालू केले.

COMMENTS