Homeताज्या बातम्याअहमदनगर

राशीनमधील सार्वजनिक जागांची विक्री बेकायदेशीरफेरफार रद्द; विकासक, खरेदीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

कर्जत : तालुक्यातील राशीन येथील बिगरशेती भूखंडांमधील सार्वजनिक सुविधा जागा व मोकळ्या जागांची शासनाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून करण्यात आलेली विक्री बेकायदेशीर ठरवत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. पुनर्विलोकन अर्ज क्रमांक ३५२/२०२५ मंजूर करत फेरफार क्रमांक १०१८०, ११८२८, १५५७, १६५०, १८५५, १४८४, ११११८ व ११४४३ तात्काळ रद्द करण्यात आले आहेत.या प्रकरणात संबंधित विकासक व खरेदीदारांविरुद्ध राशीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून तत्कालीन तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई दुर्मिळ मानली जात असल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.यासोबतच तहसीलदार, कर्जत यांनी दिलेला बिगरशेती आदेश क्रमांक कावि/जमीन/१३५४/२०२५ दि. २५ सप्टेंबर २०२५ हाही रद्द करण्यात आला आहे. संबंधित सार्वजनिक सुविधा जागा व मोकळ्या जागांची नोंद राशीन ग्रामपंचायतीच्या नावे सातबारा उताऱ्यावर करण्याचे निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.या प्रकरणाची सुरुवात माहिती अधिकार कार्यकर्ते योगेंद्र सांगळे यांनी १७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री सचिवालय व जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे दाखल केलेल्या तक्रारीतून झाली होती. राशीनमधील २७ बिगरशेती आदेशांमध्ये अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी चौकशी करून सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला.प्रकरणातील विकासक व खरेदीदारांना म्हणणे मांडण्यासाठी सुमारे नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, गाव दप्तरी नोंदी व अन्य कागदपत्रांच्या आधारे सार्वजनिक सुविधा जागांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारीतील तथ्य मान्य करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी संबंधित फेरफार व बिगरशेती आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला.योगेंद्र सांगळे यांनी दावा केला आहे की, राशीनमधील इतर बिगरशेती आदेशांचीही पुढील काही दिवसांत तपासणी होऊन आवश्यक कारवाई होऊ शकते. तसेच संबंधित विकासक व खरेदीदारांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ तसेच भारतीय दंड संहितेतील फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.दरम्यान, सार्वजनिक सुविधा जागा व मोकळ्या जागा या नागरिकांच्या वापरासाठी राखीव असतात. त्यामुळे त्यांची विक्री कायद्याने ग्राह्य धरली जात नसल्याने या आदेशाकडे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कारवाई म्हणून पाहिले जात आहे.

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
पिके जळू लागल्याने पारनेरमध्ये शेतकरी आक्रमक खडकवाडी वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन
सुपा येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमकउड्डाणपुलासह सिग्नलची मागणी ; सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

COMMENTS