Homeताज्या बातम्या

‘जमीन हेच तुमचे अस्तित्व, ती विकू नका’ : राज ठाकरे यांचे कोकणवासियांना आवाहन

रायगड : कोकणातील विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी जाण्याची प्रक्रिया सुरू असून, या विकासाचा प्रत्यक्ष लाभ भूमिपुत्रांना मिळणार नसेल तर अशा

TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकन संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट
लोकमंथनच्या वृत्ताचा प्रशासनाला धक्का; सेतू केंद्र चालकांना तहसीलदारांचा कडक इशारा
Saroj - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख, प्रभावी वक्तृत्व असणारे  मा.श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ...

रायगड : कोकणातील विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी जाण्याची प्रक्रिया सुरू असून, या विकासाचा प्रत्यक्ष लाभ भूमिपुत्रांना मिळणार नसेल तर अशा विकासाचा उपयोग काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. कोकणवासियांनी आपल्या जमिनी विकू नयेत, परिसरात येणाऱ्या उद्योगांमध्येच त्यांनी भागीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे सध्या रायगडच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रखडलेले काम, रस्त्याची झालेली दुरावस्था, स्थानिकांच्या जमिनी तसेच प्रस्तावित “तिसरी मुंबई” या विषयांवर भूमिका मांडली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, त्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या महामार्गाच्या कामासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्या वेळी कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कंत्राटदारांना काम सोडण्याची वेळ का आली, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचीही पाहणी केली असता त्याची अवस्था समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. बांधकामाचा दर्जा असाच राहिला तर हा रस्ताही काही काळात खराब होईल, अशी टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांनी माणगाव परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढत त्यांचे स्वागत केले.

“तिसरी मुंबई” या प्रस्तावित विकास प्रकल्पावरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. या परिसरात शैक्षणिक नगरी, वैद्यकीय नगरी, क्रीडा नगरी, माहिती साठवण केंद्रे तसेच जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या आणण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या सर्व विकास प्रक्रियेत स्थानिक शेतकरी आणि जमीनधारकांचे स्थान काय राहणार, असा सवाल त्यांनी केला. आज जमीन असलेला स्थानिक उद्या केवळ “माजी जमीनमालक” बनण्याची शक्यता आहे. त्याच्या जमिनीवर मोठी शहरे उभी राहतील; मात्र त्या शहरांमध्ये त्याचा सहभाग किती असेल, याचा विचार करण्याची गरज आहे. बाहेरून येणारे लोक येथे स्थायिक होतील आणि स्थानिक मात्र आपल्या जमिनी गमावून बसतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

“स्थानिकांना अंधारात ठेवून विकास नको” विकासाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, कोकणात येणाऱ्या विविध प्रकल्पांची संपूर्ण माहिती स्थानिक नागरिकांना दिली पाहिजे. विकास प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार, व्यवसाय आणि आर्थिक संधी मिळणार नसतील, तर त्या विकासाचा फायदा कोणाला होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“जमिनी विकू नका; उद्योगांमध्ये भागीदार व्हा” कोकणवासियांना त्यांनी विशेष आवाहन केले. परिसरात येणाऱ्या उद्योगांना केवळ जमिनी विकण्याऐवजी त्या उद्योगांच्या आर्थिक प्रक्रियेत स्थानिकांनी भागीदार होण्याचा प्रयत्न करावा. “तुमची जमीन हेच तुमचे अस्तित्व आहे. ती कोणत्याही परिस्थितीत विकू नका,” असे आवाहन त्यांनी केले. उद्योग येत असतील तर त्यातून स्थानिकांना केवळ मोबदला मिळण्याऐवजी दीर्घकाळ आर्थिक लाभ मिळायला हवा. त्यासाठी स्थानिकांनी उद्योगांमध्ये भागीदारी मिळवण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

COMMENTS