Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’चा मोठा दणका; गोदावरी पात्रातील ३ बोटी जागीच स्फोट घडवून नष्ट, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत उस्माननगर पोलिसांनी मोठ

नांदेडमध्ये अवैध रेती उपशावर मोठी कारवाई; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीवर मोठी कारवाई; 57.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी

नांदेड : जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत उस्माननगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील गोदावरी नदीपात्रातून बोटींच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई करत पोलिसांनी तब्बल ४० लाख ३३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मौजे येळी येथील नदीकाठावर आनंदा नारायण ढगे यांच्या शेतालगत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेतीचा साठा आणि नदीपात्रात तीन मोठ्या लोखंडी फायबर बोटी आढळून आल्या. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. महसूल अधिकारी मोतीराम पवार आणि नेताजी रायाजी यांनी केलेल्या चौकशीत या उत्खननाला कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत ३० लाख रुपये किमतीच्या दोन मोठ्या लोखंडी फायबर बोटी, १० लाख रुपयांची एक इंजिनयुक्त लोखंडी बोट आणि ३३ हजार रुपयांचा १० ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या बोटी अत्यंत अवजड असल्याने त्या नदीपात्रातून हलविणे अशक्य होते. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत नियमानुसार जिलेटिनच्या साहाय्याने तिन्ही बोटींचा जागीच स्फोट घडवून त्या नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी दिनेश दशरथ गाढे (रा. चिलपिंपरी, ता. मुदखेड) आणि विश्वनाथ सूर्यभान आंबेकर (रा. शंखतीर्थ, ता. मुदखेड) यांच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS