Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट

गोंदवले : समाधी परिसराची पहाणी करताना आयुक्त देशपांडे व संस्थानचे विश्‍वस्त. (छाया : विजय भागवत) गोंदवले / वार्ताहर : श्री ब्रह्मचैतन्य महाराज समा

वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त
गोंदवले येथील जुगार अड्ड्यावर छापा; 3 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून

गोंदवले / वार्ताहर : श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरातील शांतता, स्वच्छता व सुव्यवस्था खूपच छान असून येथे आल्यावर मोठे आत्मिक समाधान लाभले, असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी दर्शनासाठी आज ते सहकुटुंब येथे आले होते. यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, मंदिर समितीचे विश्‍वस्त, नायब तहसीलदार हेमंत दीक्षित, मंडलाधिकारी भारत कर्णे उपस्थित होते. श्रीच्या समाधी दर्शनानंतर त्यांनी काही काळ मंदिरातील सभा मंडपात घालविला. त्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी समाधी मंदिरात सुरू असणार्‍या नित्य उपासनेची सविस्तर माहिती त्यांना विश्‍वतांनी दिली.
कोरोना काळात समाधी मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना घरोघरी शिधा देण्यात आला. तसेच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केल्यानंतर शासनाच्या नियमावली नुसार येथे सर्व खबरदारी घेत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
आपण अनेक तिर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. मात्र, येथील व्यवस्था वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून देशपांडे म्हणाले, समाधी मंदिरात सध्या शांततेत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. या परिसरासारखी स्वच्छता व नीटनेटकेपणा इतरत्र कुठेच पाहायला मिळाली नाही. श्रीच्या समाधी दर्शनाने खूप आत्मिक समाधान मिळाले. दरम्यान, समाधी मंदिर समितीच्या विश्‍वस्तांच्या हस्ते श्रींच्या प्रवचनाचे पुस्तक भेट देऊन देशपांडे व कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

COMMENTS