Homeताज्या बातम्या

नीट परीक्षार्थींसाठी रेल्वेची विशेष सुविधा; प्रवासी गाड्यांना अतिरिक्त जनरल डबे जोडणार

नांदेड : रविवार 21 जून रोजी होणार्‍या नीट (छएएढ) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तसेच इतर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण म

नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची धडक कारवाई; अल्पवयीन मुलीची सुटका, भ्रमणध्वनी चोरास अटक
नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण
NEET Exam Special Trains | नीट परीक्षेसाठी रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे,  पाहा वेळापत्रक व यादी


नांदेड : रविवार 21 जून रोजी होणार्‍या नीट (छएएढ) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तसेच इतर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने काही निवडक प्रवासी गाड्यांना अतिरिक्त सर्वसाधारण (जनरल) डबे जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे परीक्षेसाठी प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार असून प्रवाशांच्या वाढीव मागणीची पूर्तता करण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार खालील गाड्यांना नमूद तारखांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त जनरल डबा जोडण्यात येणार आहे : गाडी क्र.  57651 हजूर साहिब नांदेड – मनमाड : 20 जून 2026, गाडी क्र. 57652 मनमाड – हजूर साहिब नांदेड : 21 जून 2026, गाडी क्र. 57653 पूर्णा – आदिलाबाद : 20 व 21 जून 2036, गाडी क्र. 57654 आदिलाबाद – परळी वैजनाथ : 21 व 22 जून 2026, गाडी क्र. 57655 परळी वैजनाथ – अकोला : 21 व 22 जून 2026, गाडी क्र. 57656 अकोला – पूर्णा : 22 व 23 जून 2026, दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, नीट परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने विद्यार्थी व प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS