बीड : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त समाजासाठी निस्वार्थ भावनेने सातत्यपूर्ण कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक दादा ढोले पाटील, संस्थापक अध

बीड : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त समाजासाठी निस्वार्थ भावनेने सातत्यपूर्ण कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक दादा ढोले पाटील, संस्थापक अध्यक्ष सातिराम आण्णा ढोले पाटील सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, बीड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा रुग्णालय रक्त केंद्रातील डॉ. नागेश चव्हाण, डॉ. अनंत मुळे, डॉ. जयश्री बागर तसेच सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या 16 वर्षांपासून अशोक दादा ढोले पाटील यांनी सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शेकडो बाटल्या रक्त संकलित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी 500 हून अधिक वृक्षांची लागवड व संगोपन त्यांनी केले आहे. गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच सण-उत्सव व नैसर्गिक आपत्तीच्या काळात अन्नदानाचे उपक्रम त्यांनी नियमितपणे राबवले आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत जिल्हा रुग्णालय रक्त केंद्र, बीड यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अशोक दादा ढोले पाटील यांनी सांगितले की, हे कार्य मी एकट्याने केलेले नाही. माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे. समाजाचे आपण देणे लागतो, म्हणून हे कार्य अखंड सुरू राहील. कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, रक्तदाते तसेच मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS