बीड : बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी तरुण व तडफदार नेतृत्व म्हण

बीड : बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी तरुण व तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या इरफान सेठ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीला एक सक्रिय आणि संघटनक्षम चेहरा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
इरफान कुरेशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा युवक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुरेशी युवा मंचच्या जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरातील युवकांना संघटित करण्याचे उल्लेखनीय कार्य केले असून युवकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. इरफान कुरेशी हे बीड जिल्ह्यातील लोकप्रिय समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांचे भाचे आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष समीर काजी यांनी त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून मराठवाड्यातील मित्रपरिवार, युवक वर्ग तसेच कुरेशी समाजाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इरफान कुरेशी यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सचिन भैय्या मुळूक, स्वप्निल भैय्या गलधर, चंद्रकांत नवले तसेच समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारताना इरफान कुरेशी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

COMMENTS