अकोले : भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वतीने १४ वर्षांखालील कुस्ती मल्लांसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी शुक्रवा
अकोले : भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वतीने १४ वर्षांखालील कुस्ती मल्लांसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी शुक्रवार (दि. २४ एप्रिल २०२६) रोजी राजूर येथील सत्यनिकेतनच्या ऍड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात पार पडणार आहे.
या निवड चाचणीसाठी दिल्लीहून तज्ज्ञ कुस्ती प्रशिक्षक भोलानाथ पाल उपस्थित राहणार असून तेच निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत. या चाचणीत निवड झालेल्या खेळाडूंना दरमहा एक हजार रुपये मानधन, दरवर्षी स्पोर्ट्स किट तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रवास खर्च देण्यात येणार आहे.
याशिवाय निवड झालेल्या कुस्ती मल्लांना साई कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय पदक विजेते तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व इच्छुक कुस्ती मल्लांनी या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख व जिमखाना विभाग प्रमुख प्रा. व्ही. बी. नवले यांनी केले आहे.

COMMENTS